सावित्रीबाई आणि महात्मा जोतिराव फुले

सावित्रीबाई आणि महात्मा जोतिराव फुले

$2.99

(2)
  • Description
  • Author
  • Info
  • Reviews

Description

जोतीराव फुले शिकत असताना सर्वात आनंदी होते. पण त्यांचा जन्म माळी समाजात झाला असल्याने जुलमी जातीच्या लोकांनी त्यांना शाळेत जाण्यापासून रोखले. जगाला आपले मूल्य ठरवू न देता जोतिरावांनी स्वत:हून अभ्यास सुरूच ठेवला. अनेक वर्षांनी त्यांनी सावित्रीबाईंना, त्यांच्या पत्नी आणि सोबतीला लिहायला-वाचायला शिकवलं. छळ आणि अज्ञानाला तोंड देत फुलेंचा शिक्षणाच्या सामर्थ्यावरचा विश्वास दृढ होत गेला. दोघांनी मिळून या शक्तीचा उपयोग करण्याचे स्वप्न पाहिले; शिक्षणाच्या हक्कापासून वंचित राहिलेल्या मुलांसाठी शाळा स्थापन करणे.


जुलमी समाजाकडून मिळणारे अत्याचार आणि धमक्या मिळूनही जोतिराव आणि सावित्रीबाई आपल्या ध्येयासाठी समर्पित राहिले. घरोघरी जाऊन त्यांनी उत्सुक आणि अनिच्छुक अशा दोन्ही प्रकारच्या पालकांना आपल्या मुला-मुलींना शिक्षण देऊ देण्यास प्रोत्साहित केले. त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना लिहायला-वाचायला तर शिकवलंच, पण समाजाला प्रश्न विचारायला आणि मनातलं मत मांडायला शिकवलं. हे त्यांनी उदाहरणाद्वारे केले आणि विषमतेविरुद्धच्या त्यांच्या धर्मयुद्धाबद्दल निर्भयपणे लिहिले. फुले दांपत्याने आपले आयुष्य एका चांगल्या जगाच्या दिशेने काम करण्यात व्यतीत केले - जेथे शिक्षण पूर्वग्रहांना पराभूत करते, जिथे धैर्य क्रौर्याला सामोरे जाते, जिथे द्वेषाला जागा नसते. दोन उल्लेखनीय व्यक्तींची आणि त्यांचा असंख्य जीवनावर आजही होणारा परिणाम याची ही कहाणी आहे.


Author

Info

Reviews

Niranjan Jiragale rated on सावित्रीबाई आणि महात्मा जोतिराव फुले from सावित्रीबाई आणि महात्मा जोतिराव फुले

Niranjan Jiragale rated on सावित्रीबाई आणि महात्मा जोतिराव फुले from सावित्रीबाई आणि महात्मा जोतिराव फुले